आरसा असा मी बिलोरी
स्वछंद नभाचा प्याला
तू वार करावा राणी अन्
मी पुन्हा नवा झालेला...१
खोलात जरी किती रूतला
हा आयुष्याचा भाला
नजरेस नजर दे सजणे
मज स्पर्श कुठे झालेला...२
रात्रीत भिनूनी जाऊ
तुज निशा निमंत्रण सखये
हा चंद्र चांदणे माझे त्यांनी
सूर्य फितूर केलेला...३
उन्माद मला हा कुठला
कैफाची कविता होते
तू प्राशूनी बघ ना मजला
मन पूर्णत्वाला येते...४
हातात असे हे हात
आरश्यात बसला आरसा
तू मिटूनी घे गं डोळे
हा दंश सखा तव झाला...५
मी तुमच्या मधला एक
परी दिसतो तैसा नाही
निरखून मला बघ सखये मी
आरसा व्यक्त झालेला...६