पाऊस गाणी

पाऊस गाणी

===========

झर झर झडी
त्यात कागद होडी
खट्याळ थोडी
ति लोभस दडी..

खळ खळ घळी
पाहता गाली खळी
भज्याची थाळी
नि विजेची टाळी..

रंग रंग दारी
त्यात फुलली दरी
सण उत्सव घरी
नि दंगली सारी..

चिंब चिंब गाणी
गाती पाऊस ठाणी
खोटीच नाणी
नि पाणीच पाणी..

सर सर हट्टी
तिची पोरांशी गट्टी
शाळेला सुट्टी
नि डोक्यावर पट्टी..

गर्द गर्द झाडी
त्यात संतत झडी
भिजली गढी
नि पुराची कडी..

टीप टीप बरी
की झडच खरी
असो काही जरी
झरो रिमझीम सरी..

===========
स्वाती फडणीस
१८-०६-२०१०