डोळ्यात दाटलेले कोडे सुटीत जाता

माझ्यातली निळाई घेऊन रात गेली,
मी चुकले जगाया सांगून रात  गेली.

आभाळ चांदण्यांचे मोजून जागताना,
माझीच झोप आज घेऊन रात  गेली.

बेभान आठवांना रोखायचे कशाला,
वेडात प्रीत माझी चूंबून रात  गेली.

मी शोधले किनारे लाटेत गुंतणारे,
नात्यात या दुरावे मोजून रात  गेली.

डोळ्यात दाटलेले कोडे सुटीत जाता,
भासात प्राण माझा बांधून रात  गेली