फसगत

फसगत

जाळून आठवणींना
भस्म फासतो मी
कधी खोल तळाशी गाडुनी
परत थडगी उकरतो मी

कघी ठोकुनी खिळे
लटकावितो क्रुसावरी मी
कधी टाकुनी मनाच्या विहरीत
देतो गिधाडांना टोचण्या मी

आवळताच फास मानेभोवती
एकलाच हसतो मी
आठ्वणिंच्या जाळ्यात
पुन्हा पुन्हा फसतो मी