ह्या जगाशी ना जुळले नाते
ऊंच आकाशी रुळले ना ते
स्वस्त होते पण चुकले सारे
शेवटाला गाभुळले नाते
हट्ट वेडा सोडत नाही ती
रात्र थोडी पेंगुळले नाते
संशयाचे बी रुजले होते
दु:ख नाही, हुळहुळले नाते
जन्म माझा संकट ते होते
कोपऱ्याशी चुळ्बुळले नाते
......
कार ना थांबे , भुरटे नाते
बैलगाडीशी जुळले नाते