मूका!

मी तुला सोडून जाईन हं!

हसत सहज म्हणायची ती

उगाचच ते आठवले शब्द

काळीज सर्द नि डोळे चिंब

तसा तिचा हा छंद जुनाच

शब्दास्त्रांनी डोकं कोरायचा

नाते तोडून जाते म्हणत

बावरलेला जीव बघण्याचा

भांडल्याशिवाय गोड नाही वाटत

मुके कान शब्द झेलत असतात

ती खूप बोलते मी मुका

भांडण असत माझ्या मुक्याच ( गप्प राहण्याच बरं!)