लगीन
एक दिवस दोस्ताच्या, लग्नाले गेलो
नवरीनच्या भावाले, भलताच भेलो....1
उचा पुरा धडधाकट, भाईच जसा
मी त्याच्या म्होर, दिसो सिहा पुढ ससा....2
दोस्त म्हणे आपून, दोन दोन घुट घेऊ (बिअर)
उरली सुरली जाताना, गाडीमंदी पेऊ...3
मी मनलं आपण, जरा दूरच राहाव
दोस्तायची मजा, दूरूनच पाहाव....4
दोन घुट म्हणता म्हणता, चार चार पेले
नवरदेवा संग समदे, पारावरती गेले....5
वरातीमंदी सारे, नागोबाच डोले
मजा घेत होते, ताशा ब्यांडवाले....6
लग्नासाठी नवरदेव, मांडवात शिरला
भाईले धक्का मायां, दोस्तानं मारला....7
दोस्त म्हणे भाईले,
वरातीसाठी तुमी, घोडीच का आणली
भाईने त्याच्या, कानपटीतच हाणली....8
भाई म्हणे,
नवरदेवाले का तुया, डोक्यावर बसवू?
आरतीच ताट घेऊन, का गणपती नाचवू?...9
दोस्तांनी मायां केला, मंडपात तमाशा
भाईन हाकलल्या जश्या, मवाळुच्या माश्या...10
कुत्र्यासारखे त्यायचे, हाल त्यानं केले
जेवणापाण्यावीणा, दिवसभर सारे मेले.....11
नवरी नवर देवावर, अक्षता पडल्या
जेवणाच्या पंक्ती, पटापट मांडल्या....12
म्या मनलं आपण, आता जेवूनच घेऊ
पाच सहा वाट्या कढी, जास्तीचीच पेऊ....13
परतीच्या वाक्तिले, सर्वायचीच उतरली
लग्नातली हि वार्ता, घरोघरी पसरली...14
म्हणून,
समारंभात आपून, शायण्यासारखं वागावं
लग्नामंदी नेहमी, सावधानच राहावं....15
शुभमंगल सावधान!