प्रेयसी

हृदयात गुंफलेल्या भावना
गजऱ्यासारख्या असाव्यात
प्रेयसीच्या मिठीत जाताना
अलगद मनात माळाव्यात

गुलाबी तिचे ओठ
अलगद आपल्या ओठाआड दडतात
आणि मग आपल्या प्रीतीचे गुलाब
मनात बहरतात

माझ्यावरचे तिचे हे प्रेम
असेच अत्तरापरी असावे
रूप त्याचे विरले तरी
सुगंध होऊन मनात दरवळावे