कविता

सुचले तर होते ती कविता
हसले तर होते ती कविता
तिने नुसते पहिले तरी होते
तिच्या असण्याने होते
तिच्या नसण्याने पण होते ती कविता

बाबांनी रागावले की होते
बॉस ने झापले की होते
तिने मिठीत घेतले की होते
तिच्या भावाने मारले की होते ती कविता

अंघोळ करताना होते
गाडी चालवताना होते
कधी पावसात तर कधी थंडीत होते
कधी बसच्या तिकिटावर होते
तर कधी जी-टॅाकवर चॅट करताना होते

प्रत्येकातच ती लपलेली असते
जागेपणी नाही सुचली तरी
स्वप्नात ती आपले अस्तित्व दाखवत असते
आपल्या एकटेपणाची सोबती असते
कोणीही नसले तरी कायम आपल्या मिठीत असते