भाषांतरित गाण्यांना स्वतंत्र मराठी गाण्यांचे रूप देता येईल का?

मत्प्रिय मनोगतीनो,
आजपर्यंत आपण "गाणे ओळखा" ह्या सदरात बरीच हिंदी गाणी भाषांतरित किंवा भावांतरित केली.
ह्या भाषांतरित गाण्यांना  स्वतंत्र मराठी गाण्यांचे रूप देता येईल का? असा माझा चर्चेचा विषय आहे.
ह्या कामाबाबत कुणा मनोगतीस माहिती असल्यास येथे द्यावी. म्हणजे त्या दृष्टीने काहीतरी करता येईल.
(प्रामाणिकपणे सांगतो की मला ह्या बाबत काही माहिती नाही.)कारण, मी एकदा "ए मेरे वतन के लोगों"
 ह्या प्रसिद्ध गीताचे कन्नडमधील भाषांतर डी डी ९ वर ऐकले व पाहिले आहे, त्यावरूनच मला हा विषय
सुचला.तेंव्हा प्रतिक्रिया व माहिती यावी, ही अपेक्षा.

आपला मनोगती,

कृष्णकुमार द. जोशी