ठसा

५ वर्षा पूर्वीचा  तो जीवन बदलून टाकणारा  प्रसंग आज अजून सुधा ताजा होता त्याच्या  मनात. अगदी आताच घडून  सारखा. तो प्रसंग होताच तसा. कधीच न विसरता येण्या सारखा. बघता बघता श्री भूतकाळात रमून गेला. श्रीला लहानपणा पासूनच व्यायामाची खूप आवड. अर्थात आई मुळे लागलेली. आईची खूप  शिस्त होती एकदम कडक! पहाटे लवकर उठून दूध  पिऊन व्यायाम केल्यावरच ब्रेकफास्ट. पहाटे उठून जॉगिंगला जाणे हा श्री च्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. तरुणपणी सुधा हेच अंगवळणी पडलं होत  त्याच्या. व्यायामा सोबतच श्रीला गाण्याची, नाटकात काम  आवड होती. अगदी शाळेपासूनच तो सगळ्या स्पर्धांमध्ये असायचा. पुढे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यावर सुद्धा त्याने अभ्यासातून वेळ काढून आपल्या आवडी जोपासल्या. त्यामुळेच कॉलेज मध्ये तो एकदम फेमस होता. इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षा पासून तो  कॉलेज  मधल्या या सगळ्या गोष्टीं मध्ये  भाग घ्यायचा. मग ते वक्तृत्व स्पर्धा असो किंवा  कवी संमेलन असो... एकंदरीत कोणत्याही मुलीने भुलून जावं असं व्यक्तिमत्त्व.

या सगळ्या गोष्टींमुळे कॉलेजच्या पहिल्या  वर्षापासूनच मुलींच्यात खूपच फेमस होता श्री!! पण इतक्या सगळ्या मुली याला भाव देत असून सुद्धा  त्याला कोणीच क्लिक झालं नव्हती. खरं तर त्याला इंटरेस्ट नव्हता कोणाच्यात. पण त्याचा हा पवित्रा हळू हळू बदलू लागला तो डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला आलेल्या प्राची मुळे. प्राची दिसायला काही अप्सरा वगैरे नव्हती. पण श्रीला का कोण जाणे ती खूपच आवडली होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी स्वतःची इंट्रोडक्शन देताना तिने तिच्यातल्या गान-सरस्वतीचं दर्शन घडवलं. खरंच खूप गोड गळा लाभला होता प्राचीला. तिचे काळे भोर डोळे आणि लांब सडक केस यात  श्री पुरता अडकून पडला होता. आणि तिच्या आवाजाच्या प्रेमात पडला होता तो पहिल्याच दिवशी. हळू हळू प्राची आणि श्री ची मैत्री वाढू लागली. आणखीनच घट्ट झाली"गाणं" हा दोघांच्यातला जिव्हाळ्याचा विषय बनला होता. "गाणं" दोघांना आणखी जवळ आणत होतं. दोघांनाही जाणीव होत होती आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याची!!   श्रीला स्वतः च्यातला हा बदल जाणवत होता. पण सध्या करिअर महत्त्वाचं आहे म्हणून तो वेळ घेत होता. प्राची ला देखील जाणवत होत की श्रीला आपल्या बद्दल मैत्री पेक्षा काहीतरी जास्ती वाटत आहे पण ती देखील गप्प होती. श्री काही बोलण्याची वाट पाहत होती.

एकंदरीत कॉलेज चे गुलाबी दिवस खूप छान चालले होते. फाइनल इयरला आल्यावर मात्र  श्री ने काहीतरी डिसीजन घ्यायचं  ठरवलं आणि प्राचीला लग्नासाठी प्रपोज केलं. प्राची ला देखील श्री आवडत होता. थोडा वेळ घेऊन तिने श्रीला होकार दिला. आता पुढे खरी परीक्षा होती. घरच्यांचा विरोध गृहीत होता. कारण हे दोघा इंटरकास्ट मॅरेज करत होते. पण त्यांनी मोठ्या जिद्दीने घरातल्यांना  समजावले. पण तरी सुद्धा श्री च्या आईच्या मनात प्राची बद्दल जरा तिढा होताच. प्राची पेक्षा एकाहून एक सरस, सुंदर मुली श्री ला सांगून आल्या होत्या. पण एकुलत्या एक मुलाच्या हट्टा पुढे त्याचं काही चालत नव्हतं.

श्री आणि प्राची दोघांनीही एका आयटी कंपनी मध्ये जॉब लागला. जॉब सोबत तिचं गाणं पण सुरूच होतं. धकाधकीच्या आयटी लाइफ मध्ये गाणं हा तिचा श्वास होता. जॉब मध्ये थोडं सेटल झाल्यावरच लग्न करू असं त्यांनी घरच्यांना आधीच सांगितलं होत. जॉब मध्ये एक, दीड वर्ष झाल्यावर आता मात्र दोघांच्याही घरचे मागे लागले लग्नासाठी. आणि अखेर दोन जीवांच्या  मिलनाचा दिवस उजाडला. एका शुभ मुहूर्तावर प्राची आणि श्री एका नाजूक धान्यात बांधले गेले. इथून पुढे खरा जीवन प्रवास सुरू झाला होता. कॉलेज चे ते रंगीत दिवस फुलपाखरा सारखे उडून गेले होते. 'अरे संसार संसार' या गाण्याची उक्ती प्राचीला येऊ लागली होती. पण श्री साठी ती सर काही सहन करत होती. नवऱ्याचा आधार असला की संसाराच्या विस्तवावरून चालणं बाई साठी जर सुखकर होत.

दिवस पुढे सरकत  होते. श्री आणि प्राची च्या लग्नाला २ वर्षं झाली होती. जॉब करून घर सांभाळायचं आणि त्यात घरी आल्यावर सासू बाईंची काही न काही कूण  कुण  या सगळ्या मूळ प्राची अगदी थकून जायची. यात आता घरातल्यांना नव्या पाहुण्याची आस लागली होती. प्राचीला देखील आता आपण आई व्हावं अस वाटत होत. तसं पाहायला गेला तर सगळं सेटल होत. हरकत नव्हती नवीन पाहुणा यायला.

पण  नियतीच्या मनात काही  वेगळंच होत.   प्राचीला  दिवस जात नव्हते. श्री  आणि  प्राची ने एका नामवंत डॉक्टरांना दाखवलं. सगळ्या तपासण्या टेस्ट, वगैरे झाल्या. सगळे उपाय थकले. जप जाप, उपवास तापास सगळं काही करून झालं. "आता ]प्लॅनिंग पुरे " असे लोकांचे टोमणे देखील ऐकून झाले. ते दोघे वरकरणी हसत होते. पण आतून खूप धास्तावले होते. बाळाची आस तर  लागली होती. पण हा  "पण" मध्ये येत होता. आणि एक कटू सत्य समोर आलं. प्राची कधीच आई होऊ शकणार नव्हती हे!! सगळ्यां साठीच खूप धक्का दायक होत. श्री च्या आईला तर अजून एक नवीन विषय मिळाला होता प्राची ला त्रास द्यायला. प्राची खूप सहन करत आली होती. पण आता तिच्यासाठी सगळा असह्य होत चाललं होत. नियती पुढे तिने हात टेकले होते. रोज काहीतरी नवीन असायचंच. एखाद्या स्त्री साठी ती आई होऊ शकत नाही हि गोष्ट मरण समान असते आणि त्या मरण यातना प्राची रोज भोगत होती.

परिस्थिती पुढे हतबल होऊन परिस्थिती स्वीकारण्या शिवाय पर्याय नव्हता कोणा कडेच. दिवस जात होते. त्रास तर सगळ्यांनाच होत होता, पण त्रास सहन करण्या शिवाय पर्याय नव्हता. एकंदरीतच नियतीने केलेल्या  खेळाचा परिणाम सगळ्यांवरच झाला होता. श्री ने तर स्वतःला कामात अक्षरशः बुडवून  घेतलं होता. रोज सकाळी जॉगिंग, मग ऑफिस आणि संध्याकाळी उशिरा पर्यंत ऑफिस मध्ये थांबून काम असा त्याचा दिनक्रम सुरूच होता.   तो प्राची ला कधीच काही बोलला नव्हता आणि बोलत देखील नव्हता. पण प्राचीच मन तिला खात होता. ती श्री ला एखादं बाळ दत्तक घेऊन या म्हणून मागे लागली होती तर श्री ची आई श्री ला दुसरा लग्न कर म्हणत होती. जे कधीच शक्य नव्हत. श्री त्याचं प्राची वरच प्रेम कधीच कोणाला वाटू शकणार नव्हता. प्राचीचं गाणं पूर्ण बंद पडलं या सगळ्या  प्रकारात. ती स्वतःला दोष   देत होती आणि आतल्या आत कुढत होती.

आपल्या आवडत्या माणसाला, त्याच्यात काहीही दोष असला तरी, समाजाच्या, कुटुंबाच्या साक्षीने आपलंसं करणं किंवा समाजाला झुगारून आपलंसं करणं हा एक अवघड दुःखाचा प्रवास असतो. आपल्या डोळ्या देखत आपलं सुख दूर घेऊन जाणारं. श्री च्या बाबतीत देखील हेच घडू लागलं होतं.

एक दिवस श्री नेहमी प्रमाणेच जॉगिंगला जायला निघाला. पहाटेची वेळ होती. खूप थंडी होती तरी पण जॉगिंग ची सवय आधी पासून असल्याने थंडी श्री ला थांबवू शकत नव्हती. त्या दिवशी पण खूप थंडी होती. प्राची त्याला सांगत होती की आज नको जाऊस. पण श्री ने ऐकलं नाही. तो गेलाच. आज का कोण जाणे काही तरी वेगळंच वाटत होत त्याला. जॉगिंग झाल्यावर एका बाकावर बसला, जरा दमला होता म्हणून. आणि अचानक त्याची नजर एका निळ्या रंगाच्या कापडावर पडली. काही तरी गुंडाळून ठेवलेलं होतं त्यात. त्याने सुरवातीला जरा दुर्लक्ष केलं. पण काही वेळाने त्याला तिथे हालचाल जाणवली. त्याने नीट पाहिलं आणि त्याला कळलं की त्या निळ्या कापडात एक छोटं बाळ होत. अगदी काही तासांच असेल. इवलंसं ते पिल्लू कोणाला तरी नकोस झालं होत बहुतेक. आणि कोणीतरी त्या काही तासांच्या बाळाला सोडून निघून गेलं होत. श्री ने त्या बाळाला उचललं. आणि क्षणात ते बाळ रडायचं थांबलं. जणू तो लहानगा जीव श्री येण्याचीच वाट पाहत होता. ती एक मुलगी होती. श्री ने तिला हृदयाशी कवटाळलं.   जणू देवाने त्याच्या आयुष्याला अंधार दूर करायलाच तिला पाठवलं होत.

त्या बाळाला उचलून घरी न्यायच अस श्री ने मनाशी पक्कं ठरवून टाकलं. आणि  क्षणाचाही विचार न करता तो घरच्या दिशेने चालू लागला. नेहमीचा घर त्याला लांब वाटू लागलं. कधी एकदा घरी जातोय आणि प्राचीला बाळ दाखवतोय अस झालं होत त्याला. घरा जवळ पोचला आणि बाहेरूनच प्राची, प्राची म्हणून हाका मारू लागला. प्राची खूप वर्षांनी श्रीला असा हसताना पाहत होती. तिला काही समजेना हा इतका का ओरडतोय ते. त्याच्या हातात काहीतरी निळं कापड दिसत होत आणि तो धावतच घराजवळ येत होता. ती पटकन दारा जवळ गेली आणि श्री ने त्या बाळाला तिच्या हातात दिला. तिला काहीच कळेनास झालं. ती फक्त त्या इवल्याश्या जिवा कडे पाहताच राहिली. श्री ने या बाळा कुठून आणलं, कस आणलं काही काही तिच्या मनात आलं नाही त्या वेळेस. ती फक्त त्या बाळा कडे पाहताच होती. शब्द मुके होऊन गेले.   आणि तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागलं. श्री ने तिला धरून हॉल मध्ये सोफ्यावर बसवलं आणि रडू दिल.

नंतर थोडा सावरल्यावर श्री ने प्राचीला आणि आईला सगळी हकिकत सांगितली. ती पहाट, थंडी आणि ते निळ्या कापडात गुंडाळलेलं काहीतरी श्री च्या जीवनात कायम घर करून राहिलं. घरात वेगळंच वातावरण निर्माण झालं होत बाळ आल्या पासून. सगळे अगदी बाळाच्या मागे लागले होते. नव्या पाहुण्याने श्री च्या घरात अगदी उत्साहाच निर्माण केला होता. श्री ने तिच नाव काव्या ठेवलं.

बघता बघता काव्याच्या इवल्याश्या पावलांनी सगळं घर काबीज केलं होतं.   श्री, प्राची, श्रीची आई अगदी काव्या मध्ये गुंतून गेले होते. काव्या मुळे.

 ५ वर्षा पूर्वीच्या या सगळ्या घटना आठवताना श्री चे डोळे भरून आले होते. काव्या ५ वर्षांची झाली होती. आणि श्री त्याच बेंच वर बसून दुडू दुडू पाळणाऱ्या काव्या कडे पाहत होता. इतक्यात मागून खांद्यावर कोणी तरी हात ठेवला. प्राची होती ती. श्री च्या बाजूला बसून ती सुधा काव्या कडे  हरपून पाहत राहिली. न सांगताच दोघांना एकमेकांच्या मनातल्या भावना समजल्या. ते  दोघं भानावर आले तेव्हा त्यांना समजलं की काव्या त्यांना बोलावत आहे तिच्या सोबत खेळायला.

श्री तिथून निघाला खरा पण ती पहाट, तो हिवाळा आणि ते निळ्या रंगात गुंडाळलेला इवलंसं  बाळ यांचा "ठसा" त्याच्या हृदयावर कायमचा कोरला गेला होता….