जुने मनोगती सदस्य श्री श्रावण मोडक ह्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी आंतरजालावर वाचायला मिळाली आणि अत्यंत दुःख झाले.
मनोगताच्या सुरवातीच्या काळापासून मनोगताच्या विविध सदरांमध्ये आणि उपक्रमांमध्ये ते आवर्जून भाग घेत असत. अनेकदा प्रशासनाला त्यांच्या वृत्तपत्र माध्यमातील अनुभवांतून मार्गदर्शन झालेले आहे. अनेकदा त्यांनी विविध सुचवणींद्वारे लेखमाला, शुद्धलेखन इत्यादि विविध सदरांत अनेक गुणविशेष वेळोवेळी सुचवलेले आहेत, त्यांची आठवण होते.
पूर्वी वृत्तपत्र माध्यमांत प्रकाशित करण्यासाठी प्रशासनाकडे साहित्याची विचारणा केलेली होती पण प्रशासनाला तेव्हा इतर गोष्टींमुळे ती पूर्ण करता आली नाही ह्याची आता खंत वाटते.
त्यांच्या मनोगतावरील साहित्याचा मागोवा ह्या दुव्याद्वारे घेता येईल : समग्र 'श्रावण मोडक'
ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या आप्तस्वकीयांस ह्या शोचनीय धक्क्यातून सावरण्यास बळ देवो ही प्रार्थना.