ह्या शब्दांचा अर्थ काय?

वैषम्य: वैषम्य ह्या शब्दाचा मला माहीत असलेला अर्थ मत्सर, असूया असा आहे. विषम ह्या शब्दापासून हा शब्द बनलेला आहे. परंतु हल्ली बऱ्याच ठिकाणी ’मला ह्या गोष्टीचे वैषम्य वाटले.’ अशा वाक्यरचना आढळतात. त्याठिकाणी वैषम्य हा शब्द दुःख ह्या अर्थाने वापरलेला असतो.
’वैषम्य’चा अर्थ असा आहे का?

निर्भर : निर्भर हा शब्द मराठी भाषेत असल्याचे मला माहीत नाही. परंतु काही नामवंत लेखकांच्या मराठी पुस्तकात मी हा शब्द वाचला आहे. त्यांनी तो निष्पाप, निरागस अशा काहीशा अर्थाने वापरलेला आहे. हा शब्द मला माझ्याकडील मराठी - हिंदी, मराठी-इंग्रजी शब्दकोशांत मिळाला नाही. मात्र ’निर्भर होना’ ह्या हिंदी शब्दप्रयोगाचा अर्थ ’अवलंबून असणे’ असा आहे.

तरी जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा ही विनंती.