मशीन लर्निंग वापरून मराठी भाषेचा अभ्यास

फक्त चार / पाच ओळींचा कोड लिहून आपण मराठी भाषेतील संबंधित तसेच विरुद्धार्थी शब्द शोधू शकतो. उदाहरण म्हणून मी "संगीत" हा शब्द दिल्यावर मॉडेलने "कला" , "कविता",   "नाटक" , "महाराष्टर", " "भारत" असे शब्द दिले. 
आता यात काय मोठे दिवे लावले? असा प्रश्न  साहजिकच आहे. तसेच संगीताचा युद्धाशी आणि कंपनीशी कसा संबंध ते स्पष्ट करा असा उपरोधही अपेक्षित आहे.  त्याचे उत्तरः 
१) हे मॉडेल विकिपीडियावरून फार पूर्वी बनवलेले आहे. २०१३ साली मराठी विकिपीडियावर फारसे लेख नव्हते. जसा डेटा वाढत जाईल तशी क्वालिटी वाढेल.  गुगल  न्यूजचा डेटा  वापरून वापरून बनवलेले (इंग्लिश) मॉडेल  प्रसिद्ध आहे. मराठीला तेवढी उंची गाठायला वेळ लागेल. पण  निदान शक्यता वाटू लागली आहे.
२) अनेकदा आवाहन करूनही मराठीसाठी काही करू शकणारे स्वयंसेवक मिळत नाहीत. ज्यांना वेळ आहे त्यांना संगणक हाताळता येत नाही.  तर संगणक तत्ज्ञांना अशा कामासाठी वेळ नाही. मशीन लर्निंगच्या माध्यमातून भविष्यात मोठमोठे कोशदेखील सिद्ध होतील. असे कोश १००% अचूक नसतील हे मान्य. पण त्यातून कामाची निकड भागेल. हे महत्त्वाचे .
 
या क्षेत्राचे  भवितव्य उज्ज्वल आहे. मराठीच नव्हे तर सर्व तरुणांनी यात लक्ष घालायला हवे.