मी, गाढव आणि त्या दोघी!
खूप दिवसांनी एकत्र निघालो त्या दिवशी आपापल्या ऑफिस ला जायला निघालो..
घरापुढील मोठ्ठया उतारावरून डाव्या बाजूने एक अफलातून सुंदर मुलगी स्वतः:ला सावरत हाय हिल्स घालून ती 'हिल' काशी बशी उतरत होती.. उतारावरलं एक गाढव, नक्की गाढवंच होतं गाढविण नव्हती, कारण माझ्यासोबत त्याचं ही लक्ष तिच्याकडेच!
डावीकडे हे असे तर उजवीकडल्या साइड मिररमध्ये, बाइकवरून स्कार्फ हेल्मेट घालून माझ्या मागून उतरणारी माझी बायको...
घातलेल्या गडद्द गॉगल मधूनसुद्धा मला नक्की माहिती की तिला तिचे "गाढव" सापडलंय व्यवस्थित! खुणेनेच मला थांबवलं आणि काच खाली करेपर्यंत मला म्हणते, "त्याचं ठीके त्याची गाढविण मागे नाहीये, पण तुला कळायला नको का?"
मग भुर्रकन बाइकवरून जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत आम्ही दोघं विचारात, मला प्रश्न की "मला काय गरज होती?" आणि त्याला बहुतेक, "त्यात काय एवढं?"