कूटविभाग

माननीय प्रशासक, 

सर्वप्रथम विजयादशमीच्या शुभेच्छा!

ऊर्ध्वश्रेणीकरणानंतरचा मनोगत चा चेहरामोहरा अत्यंत आकर्षक झाला आहे. खूप छान.

एक सुचवावेसे वाटते की आपल्या ह्या मनोगतावर एक स्वतंत्र "कूटविभाग" असावा, जिथे मनोगती एकतर कूट टाकतील अथवा अन्य मनोगतींनी टाकलेली कूटे सोडवतील. तीत, शब्दकोडी, शाब्दिक कोडी, गणितीय कोडी, कूटात्मक प्रश्न असे प्रकार समाविष्ट होऊ शकतील.

कृपया विचार व्हावा अशी विनंती.