प्रिय बाबल्या

प्रियबाबल्या,

कैसेहो दोस्त? मी कालच्याला हिते आलो. आल्याआल्या तुझी चौकशी केली. म्हनलंआपना भिडू किधर है बगावं पण अरे, कुनी काय धड बोलेना. शेवटी एका पारावार निवांत बिडी ओढतबसलेले तुझे दोन गाववाले दिसले. माझी काय जानपछान नाय पन म्हनलं इचारून बगावं. बाबल्याकुठे असतो म्हनून पूछताछ केली. तर त्यातलाएक बेवकूफ कारण नसताना खेकसून म्हणाला, बाबल्या? कोणाचा तो खोताचा की मायझंया मडवळ?मग मडवळ म्हटल्यावर तोपुन्हा गुस्सैला होऊन म्हनाला, तो ना? त्यांस इथे येऊन रग्गडवरसे झाली. आणि त्या शिंचाचे बूड एका थार्‍यावर कुठलें असांयला? इथे आहे का बघ. असेम्हणून त्याने एक पत्ता दिला. आधी माथा सरकला पण नंतर म्हनलं की आता कशाला दुष्मनी? म्हून त्या बुढढ्यानेदिलेल्या आड्रेसवर लेटर टाकतो आहे. तुला भेटले तर रिप्लाय टाक, काय?

बाबल्या, गावात तुला भेटलोतेंव्हा सगला गाव तुला शिव्या घालत होता. लोक म्हनायचे, बाबल्याला खायालाभेटलं नाही तरी पर्वा नाय, पन पेनार म्हंजे पेनार. सदानकदा पियाला कशी मिळेल हाचविचार बाबल्याच्या डोक्यात, चार आने भीक दिली तरभीक विकूनबी तो पेनारच, गावातले शेंबडे पोरसुद्धा म्हणत असे. पण तुझ्यासारखी अंगावरझेलनारा माणूस गावात दुसरा नाय असे पेस्तंवच्या गुत्त्यावरचे झिलगे बाटलीची आणघेऊन सांगत. मी तेनला त्यांना म्हणत असे , अरे कोन बाबल्या की फिबल्या, या मुंगीची ताकद तुम्ही बघीतली नाही. नावाचामुंगी,पण कानात शिरलो की हत्तीलाबी घायल करून टाकल. आणि हिमतीला कमी पडणारा माणूस नव्हतोमी बाबल्या. आबा गावातला मोठा माणूस, पण त्याच्या झिलाला कोठडीत अडकवलन की नाही मी. डरतो का काय कुणाच्या बापाला? त्यातून गावातलाबाबुलीसारखा डॉन पाठीशी उभा राहिला माझ्या, मग मला कसली भीती? पियाचा जाऊ दे, पियाची तर लत होतीच आपल्याला, पन बिगर वळखीच्यामानसासंगट कवा पियाला बसलो नाय आपन. कदी नव्हे ती गलती झाली बाबल्या. तू पियाला बोलावलंस पयसे पण देतोम्हणलास म्हणून मी आलो. तीच चूक झाली बाबल्या, घात झाला. पिणार्‍या माणसाला, कुणी आपल्यापेक्षा सवाई झालेला पटत नाही. गुत्त्यात तुज्याकानावर आलं आसंल की, हा कसला पिनारा, एका ग्लासात डाऊन होतो, पब्लीक हेटाई करूनबोलतं. तुझ्याबरोबर इर्षा करायची नव्हती मला, कांपिटिशन नाय. पण म्हणालं कोण हाय कोण हाबाबल्या बघावं एकदा.

बाबल्या, तुझ्याबरोबर बाटली उघडली आणि किती घेतली याचाभान नाय राहिलं. मी चणे, फुटाणे, बैदा तरी खात होतो, पण तू कशाला हात पण नाय लावला. तेवाच आपली बॅटरी पेटली. म्हनलं तूच खराबॉस. आपण बाहेर पडलो तेंव्हा सगळा गावमाझ्या नजरेसमोर गरागरा फिरत होता. एकदम राऊंड राऊंड. वाटेत कशाला तरी पाय अडला आणि मी एकदम डाऊन.सुपडा साप झाला आपला. पुढचा काय आठवत नायमला. होश आला तवा सामने आमचे सायेब, समदा गाव आणि हसणारा आबा. झाला, नऊ म्हयने सस्पेंड. बिनपगारी. जिते शानमदे बुलेटला किक मारूनआपल्या एरियात एक राऊंड मारला तरी सौमधले पचास आपल्याला सल्यूट मारत होते तेथे साला आपल्याला कुत्तापणविचारेनासा झाला. वक्त वक्त की बात है बाबल्या. नोकरी गेली पन आदत नाय गेली आपली.सगला पैसा गेला, बायकोच्या अंगावरचा सोना गेला आणि शेवटी बायको पन सोडूनगेली. जाताना मुलालाबी संगट घेऊन गेली.रातीला टाईट झालो की बच्चाची याद यायची. साला रडू यायचा. एकदा सगली इज्जत सोडून तिला भेटायला तिच्या घरी गेलो तर सासर्‍यानेअंगावर कुत्रे सोडले. बायकोची भेट सोडच, सर्कारी दवाखान्यात जाऊन पोटात लांब सुईची चवदाइंजेक्षनें घ्यायला लागली. आता बोल!

मगकाय विचारतोस? इकडे तिकडे तिकडे इकडे भणंगगिरी करत दिवस काढले. घरदार गेलाचहोता,पण जुनी आदत गेली नाही. पैसा नव्हता, मग कंट्री, हातभट्टी जी मिलेल ती घेत राहिलो. पोटाची दुखणीहोतीच. मग पोटातली पेन लिमिटच्या भायर गेली तशी जरा जास्तच घ्यायला लागलो. दिवसा, रात्री, मिळेल तेंव्हा. एकदोनदाबेहोश झालो तवा कुठल्याश्या भल्या माणसाने सर्कारी इस्पितळात नेऊन टाकलं. तिथल्या डॉक्टरांनी दोनचार सुया मारल्या आणि भयंकरघाण आल्यासारखा चेहरा करून म्हणाले, कुठल्या बेवड्यांना आणून घालता इथें? हें जेवढ्या लवकरमारतील तेवढे बरें. त्यांची काय गलती न्हाय म्हना.आपुनच साले दरिद्री. दुसर्‍याला कशाला बोल लावा? जे करनार तेच भोगनार.

बाबल्या, तुला इकडे येताना फार तकलीफझाली नाही ना? माझे हाल बाकी कुतरे खाईना अशी गत झाली होती. कामीन झाली आणि अंग हल्दीसमान पीले पडले. पोटात पीळपडल्यासारखे व्हायचे आणि पाणी घेतले तरी उमसून उमसून यायचे. डोळ्यासमोर अंधारीयायची आणि पाय तर अंगारावर ठेवल्यासारखे जळजळ जळजळ करायचे. पोट फुगून नगारा झालाहोता. रोज दिस उजाडला की देवाजवळ आज सांज व्हायच्या आत जीव जाऊ दे मायबापा असंमागणं मागत होतो. शेवटी एकदाचा..

का झाली रे बाबल्या आपली अशी हालत? तुजा म्हायती नाय मला, पण मी चांगल्या घरातला मूल. बापूस शाळेत मास्तरहोता माझा. सुपारीच्या खांडाचा व्यसन नाय केला त्यानं. बापू मुंगी म्हणल्यावर अजूनलोक हात जोडतेत माझ्या गावातले म्हातारे. माझ्या बापूच्या पुण्याईवर माझा गावातलीपोरं कलेक्टर झालती. लोकांच्या वाळल्या गवतावर पाय न ठेवणारा बाप माझा. भाऊ माळकरीमाझा. लगीन केला नायी त्यानं. आई गाण्याच्या शिकवण्या घ्यायची. बाबल्या, सकाळी झोपेतून हलूचजागा होत असताना आईच्या आवाजातली भजनं ऐकली की असं वाटायचं की माडावरच्या हलनार्‍याझावल्यांतून आवाज येतो तिजा. गोरीगोरी, नऊवारी लुगडं नेसलेली बारीक आंगाची माझी मायअजून सपनात येते माझ्या. बापाच्या पगारातनं सगल्यांच्या कपड्याला पुरेल इतका साबूयेत नसे. माझी माय माझी शाळेची शर्टचड्डी साबूने धुवीत असे. म्हणायाची, माझा लेकाला शाळेतकुनी बोलायला नको. फुडे नोकरीच्या वेळी माझ्या बापूला शब्द टाकावा लागला नाही.त्याच्या हाताखाली शिकून गेलेल्या अंमलदाराने परस्पर जुळणी करून मला पोलिसात भर्तीकरून घेतला. बापूला कळलं तेंव्हा म्हयनाभर बापू बोलला नाही माझ्यासंगे. बोलला, शिकवण्याचं काम म्हणजेभगवानकी सेवा. त्याचा मोबदला घेतला की देवाचा अवमान हुतो. असल्या घरातनं आलेला मी.हवालदार झालो आणि दुनिया बदलली माझी बाबल्या. पयल्यांदा हप्ता गोला केला त्या दिसीरातीला बापूची सूरत डोलयांसमोर आली आन झोप नाय लागली. मग कुणीतरी सांगितला की दोनचमचे ब्रांडी पान्यातून घे म्हून. कडूझार लागली ती, पन दवा म्हून घेतली. मग साली आदत पडून गेली. मग घेतल्याबिगार नींद पनयेईनाशी झाली. मोक्याच्या बीटवर होतो, सायेबपन एक रोटी चौगातमिलून खानारा होता. आपल्याकडं खोका आला की समद्या चौकीला त्यातला वाटा देनार.दिवाली बिवालीला तर असली साला इंग्लिश माल भेटत हुता. मग आपुन फुल चौबीस घंटेटाईट. घरवाली मचमच करायला लागली तर तिच्या गल्यात सोन्याची साकली घालत हुतो, साली ती बी खूष आनअपुन बी.त्यातनं बी कदी माथा पकवला तर एक लाफा ठिवुन देत हुतो. साली भंकस नायपायजे आपल्याला.

पनकिस्मतबी लई कुत्ती चीज हाय बाबल्या. दिन पालटायला वखत नाय लागत. सायबालाअॅंटीकरपशनवाल्यांनी अंदर केला आन आपली बॉम्बेतून डायरेक ट्रान्सफर कोकनात. म्हनलंठीक हाय, दो चार म्हयने अंडर्ग्राऊंड. पर एकदा पनवती लागली नाबाबल्या, तर मग तुमाला तुमचा भगवानपन भायेर काडू शकत नाय. मौतकुटल्या सूरतमध्ये येईल कलनार पन नाय. इथेपन तुझ्यासंगट एकदा..

जानादो बाबल्या. रात गयी, बात गयी. आपली काय कंपलेन नाय. जिंदगीचा असा लोचा झाला तोकाय कुनाच्या दुसर्‍याच्या करनीने नाय. आपुनच साला कुल्हडीवर पैर मारून घेतलात्याला दुनिया काय करनार? माजीबी ष्टोरी तीच आन तुजीबी ष्टोरी तीच. पन तुला लेटर लिवायचा कारन म्हंजे आपलातुज्यासंगे काय वांदा नाय आपला हे तुला कलवावा म्हून. माझ्या जिंदगीत तू शैतानहोऊन आला तो खरा, पन तुज्या जिंदगीतपन आसाच कोनतरी शैतान होऊन आला आसल. आबानेदिलेल्या पाच रूपड्याने माजी जिंदगी बरबाद झाली, पन कायम्हाईत बाबल्या, कुणाचा तरी बोल लागून आबाला पन अशीच तकलीफ झाली आसल. जुन्यासस्पेन्स पिच्चरच्या टायटलमदी आसायचा की नाय आसा एकात एक राऊंड सर्कल सर्कल.जिंदगीबी साली अशीच आसनार, सर्कल सर्कल.

भेटएकदा. हिते नवीन आलेल्या लोकानला ठेवायला एक सेपरेट बराक हाय हे तुला म्हायती हायेच. तिच्यात कदीबी ये. कुनालापन इचार. आपलं नाव समद्या पब्लीकला म्हायती हाय.अरे,सस्पेंड झाला म्हून काय झाला, आपली अजूनबी इज्जत हाय!

तुजा दोस्त,

हवालदार मुंगी

(सस्पेंड )

संदर्भ: 'सारे प्रवासी घडीचे' - जयवंत दळवी