पाऊस

पाऊस कोसळू दे...
मृद्गंध दरवळू दे...


थेंबांसवे मनाला
आता उचंबळू दे


विरहात चांदण्याच्या
पुरते मला जळू दे


डोळ्यांमधील पाणी
हलकेच ओघळू दे...


पाहून हास्य माझे
दुःखास हळहळू दे


आहेस कोण तू, हे
आता मला कळू दे!


- कुमार जावडेकर, मुंबई