आठवण

आठवण


पावसाची सर आली, आली आठवण
चिंब अंगावर थेंब , झाली पखरण

टंच भरल्या आभाळा करू गुदगुल्या
केसांचीही हुळहूळ भाळावर ओल्या

छातीमध्ये कुपीबंद होतील का गंध?
माझे तुझे श्वास कसे पाळतील बंध?

रोमारोमातून धीट प्रेम पालवले
कसे पावसाने अंग अंग घामेजले?

कसा सांगू बरसत्या पावसाला पुन्हा?
नेहमीचा तुझा माझा भेटण्याचा गुन्हा!


-नीलहंस