परभाषीय शब्दांचे मराठीत शुद्धलेखन

परभाषीय शब्दांचे लेखन, उच्चार आपल्या भाषेत करण्याची पाळी आल्यास तसे करताना ज्या भाषेतला तो शब्द आहे त्या भाषेतल्या त्या भाषेतल्या त्याच्या उच्चाराप्रमाणेच प्रमाणेच करावेत, असा एक शुद्धलेखनविषयक नियम आहे. बीबीसी ही वाहिनी ह्या नियमाचे (इंग्रजीकरण झालेले शब्द वगळून) काटेकोरपण पालन करताना दिसते. पण मनोगतावर, पेपरांत, मासिक-पत्रिकांत ह्या नियमाचे पालन होताना दिसत नाही. मी डेस्कार्टेस आणि देकार्त मध्ये चूक केली होती, ती आठवली. ते आपण का करू नये?

तरी, ह्या चर्चेत नेहमीच्या बोलण्यात येणारे परभाषीय शब्द मूळाबरहुकूम द्यावेत.

मी सुरवात करतो.


मराठीत P, C, D सारखी अक्षरे पी, सी, डी अशी दीर्घच लिहावीत. पि, सि, डी अशी लिहू नयेत.


सायकोलॉजी चूक
सायकॉलजी बरोबर

साधारणपणे, ओ-एल-ओ-जी-वाय चा ऑलजी असाच उच्चार होतो.

सिम्बायोसिस चूक
सिम्बियोसिस बरोबर (यो चा उच्चार प्रमाण ब्रिटिश इंग्रजीत यौ च्या आसपास असतो.)


नाम असल्यास
प्रॉजेक्ट चूक
प्रोजेक्ट (प्रो च्या उच्चाराच्या बात यो कडे लक्ष द्यावे.)
प्रजेक्ट क्रियापद असल्यास

पॅरिस चूक (पण रूढ, इंग्रजीप्रमाणे)
पारी बरोबर (फ्रेंचप्रमाणे)

एड्स चूक एड्ज(ज हा जात्यातला)
डी, एम, एन, आर आदी अक्षरानंतर नंतर एस आल्यास उच्चार ज़ सारखा होता.

सन्स आणि डॉटर्स चूक
सन्ज़ एँड डोटर्ज़  बरोबर

मॅथेमॅटिक्स चूक
मॅथमॅटिक्स बरोबर

फाइल बरोबर(पण फाईल मराठीत रूढ झाला आहे)

भारतीय इंग्रजी उच्चार हे ब्रिटिश इंग्रजीच्या जवळचे असल्याने इंग्रजी शब्द लिहिताना मी ऑक्सफ़र्ड एडवान्स्ड लर्नर्ज़ डिक्शनरी चा आधार घेतला आहे. चुका असल्यास जरूर सांगावे. भर घालावी. फक्त शब्द नेहमी वापरात येणारे असावेत.