काय सांगू तुला आता.. माझ्या मनातली व्यथा,
दिस सरता सरता... लागे हुरहुर किती..
वारा भरतो हुंकार... त्याच्या मनीचा पुकार,
कसा देऊ मी होकार.... उडू राहे फ़क्त माती...
वर आभाळ दिसतं.... ते भेसुर असतं,
कधी उदास भासतं.... एक वेगळीच भीती...
संधिप्रकाश लोटतो... मग अंधार वाटतो,
कधी काळोख दाटतो.... कशा सरतील राती.....
मग दिसतं चांदण... त्याचं रुपही देखणं,
माझं एकच मागणं.... नको नकोच ही प्रीती !!!
-जयेश