असाहाय

दु:ख आम्ही खातो

वर अपमानाचे पाणी पितो

आपल्यांनीच केलेली अहवेलना

सोसायला परत परत तयार राहतो

सामर्थ्य आमचे तोकडे आहे

त्याला असाहायतेचे कुंपण आहे

कुंपणात अडकलेले आम्ही

प्रेमाचे भुकेले आहोत

पूर्व आम्हाला पारखी झाली

सगळीकडे पश्चिम पसरली

उदासी भरुन उरली

अवकाशाच्या सिमेपर्यंत

आता एकच गोष्ट निश्चित झाली

सोसणे आहे आपले नशिबी

सोसणे ही ही एक कला आहे

ती बाणवावी लागते अंगी

नाही रागवायचे नाही भांडायचे

हसत हसत इथून निघून जायचे

कायमचे