वाळल्या भेगाळलेल्या जखमांच्या खपल्या
फिरूनी एकदा लसलस ओल्या
सैरभैर पापण्यांच्या झऱ्यावर
थरथरतात नकारांच्या फुल्या
ओळखून घे, समजून घे
सांजेचे कोवळे ऊन नाही ग तुझे
जडलेल्या जीवाला समजावं
दगड होऊन पड म्हणावं
दगडांना रूजणं माहीत नाही
प्रेमाचे धुमारे त्यांना फुटत नाहीत
ऊरी फुटले तरी असतात मुकाट
कुणी ठोकरलेच तर दुसरी वाट