जे माझे ते सारेच तुझे
देउन तुला टाकित रिक्त उसासे
शोधीत होते मी तुझे ठसे
होतेस का दिले तू म्हणून माझे
दिसलास अन सूर गवसले
होते उन तरी मी चांदणे ल्याले
सावळा स्पर्श तुझा
तरारली मनात तृषा
कोण जाणे होते
सत्य की स्वप्न
एकदा तरी तू येशील ना खरा
स्वप्नातून उतरून अलगद सामोरा
नाही म्हणू नको
मनात मला हिणवू नको
सत्ये झेलून थकलेल्या कुडीला
आणिक एक सत्य तू सांगू नको