अक्राळविक्राळ महानगरातील
एक वेठबिगार मी
साऱ्या धुरकट मलीन रेघांतून
मनाला जीवंत ठेवणारी मी
वाट्याला आलेले मुकाट सोसले
तरीही हळवे कोवळे स्वर जपले मी
जगात असेनही आस्तित्वहीन
मनात सूर्याचे तेज तेवले मी
दबून, मोडून जरी जगले
मनात प्राजक्त बहरला मी
असूनही वेठबिगार
अंतरंग माझे जपले मी