हर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी

हर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी

हर क्षणी बदलते आहे रूप जिंदगी | सावली आहे कधी, कधी ऊन जिंदगी ||
हर क्षण इथे मनभर जगा | अशी वेळ ये, ना ये पुन्हा || धृ ||

तुम्हाला जो, खरा चाहतो | कठीण आहे, गवसणे तो ||
असा जो कुणी, आहे जिथे | सुस्वरूप तोच, सर्वांत आहे ||
त्या व्यक्तीला संगत धरा | अनुकूल ती, ना हो पुन्हा || १ ||

पापण्यांची, करून छाया | निकट येई, कुणी जेव्हा ||
सांभाळले कितीही, तरी ते | हृदय वेगे, स्पंदू लागे ||
बघ ह्या क्षणी, जी घडत ती | ती कहाणी ना हो पुन्हा || २ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २०७०४०३