हिंदी चित्रपटातील मराठी पात्रे

कित्येक हिंदी चित्रपटांत हिरो किंवा कुठलेसे दुय्यम पात्र चक्क मराठी दाखवतात. पण ते पात्र आपल्या मराठी नावाला शोभेल अशी भाषा, हेल वगैरे काढायच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे कित्येकदा ते अत्यंत हास्यास्पद वाटते.
काही उदाहरणे तेजाबमधे अनिल कपूर काहीतरी देशमुख नावाने वावरत असतो. गुलाममधे अमीर खान आणि त्याचा बाप दलीप ताहिल दोघे मराठी! बापतर म्हणे मध्यमवर्गी शाळामास्तर. कुठल्याही प्रकारे हे लोक मराठी वाटत नाहीत. गर्दिशमधे अमरीश पुरी पुरुषोत्तम साठे असे नाव बाळगून असतो! अगदी अगदी विसंगत. मुंबईत वाढलेला मराठी नावाचा हवालदार अस्सल पंजाबी ढंगाचे हिंदी का बोलेल?
कुठल्याशा सिनेमात शक्ती कपूर इन्स्पेक्टर भेंडे की कायसासा बनला होता. "पण मी आहे इन्स्पेक्टर भेंडे" हे वाक्य शेकडो वेळा मोडक्या मराठीत बोलण्यापलीकडे मराठीपण नाही. असो. अशी अनेक उदाहरणे आहेत.

गीताई अधिकरणमाला














अध्याय अधिकरण
१  एक ऐतिह्य-कथन दोन दैन्य-प्रदर्शन  
२  तीन कृष्णास शरण चार आत्म-प्रबोधन
पांच पाळू स्व-धर्मास सहावा बुद्धि-योग तो
सात योगी स्थित-प्रज्ञ थोर आदर्श आमुचा

एक शंका

प्रशासक महाशय,
'मनोगत'वर आधी इतर सूचीस्थळांवर टाकलेले साहित्य दिल्यास चालते का?कि साहित्य यापूर्वी अप्रकाशित असावे?


आपला,


मिलिंद फणसे