मराठी भाषेतील दालनात अद्भुतरम्य कथांचे एक आगळे आणि वेगळे असे अस्तित्व आणि महत्व ठरलेले आहे. हे दालन ह. ना. आपटे, गों.ना.दातार, नाथमाधव आणि शशी भागवत याच्यां सारख्या प्रतिभासपंन्न सारस्वतानी मनापासुन सजविलेले आहे.
अद्भुतरम्य कथांचे हे दालन मधासारखे अविट आहे. अविट, मधुर, गोड-गोड आणि हवेहवेसे वाटणारे. प्रसंगी औषध म्हणुन वापरतायेण्यायोग्य. या कथांचे अनेकाविध वैशिष्टे मराठी वाचकांना नेहमीच भुरळ टाकत आलेले आहे.