ट्रान्स

नीट विचार केला की समजतं की आपल्या बऱ्याचशा आवडी-निवडी ह्या इतरांकडूनच घेतलेल्या असतात. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही, ह्या दोन्ही गोष्टी स्वतःच्या स्वतःला आणि वेळेत कळणं हे फार महत्त्वाचं असतं.
सुदैवानं एक-दोन गोष्टी तरी अश्या आहेत की ज्या माझ्या मला समजल्या आणि आवडू लागल्या.
अश्या मोजक्या गोष्टींमधली एक म्हणजे 'ट्रान्स' !
अनेक प्रकारचं संगीत, अनेक गायकांची, चित्रपटातील गाणी ऐकून झाली. पण 'अपलिफ्टिंग ट्रान्स' जसा ऐकू लागलो, तेव्हा एकदम खात्री झाली, की हेच ते संगीत जे आपल्या मनाला भिडतंय !

फेसबुक

   झुक्याचं कुठून डोकं चाललं आणि त्यानं फेसबुक तयार केलं देव जाणे!
लिफ्ट मध्ये असताना आपला मजला यायचाय का? काढ फेसबुक, बोलता बोलता मित्राला फोन आला, काढ फेसबुक. हॉटेल मध्ये जेवण यायचंय का? काढ फेसबुक. सकाळी विधींना जाताना - काढ फेसबुक...
बघावं तिथे जो तो फेसबुक वर. प्रत्येकाला मोहात पाडण्यासारखं आहे तरी काय ह्या फेसबुक मध्ये?

रोहिणी गोडबोले यांना पद्मश्री

मी २००८ च्या मनोगताच्या दिवाळी अंकात ज्यांची मुलाखत घेतली होती त्या प्रा. रोहिणी गोडबोले यांना भारत सरकारने आज पद्मश्रीने सन्मानित केले. त्यांचे हार्दिक अभिनंदन!!!  प्रा. गोडबोले ह्या बंगलोरच्या इंडियन इंस्टिट्यूट अॉफ सायन्स येथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. उच्च ऊर्जा भौतिकी हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मनोगताच्या २00८ च्या दिवाळी अंकात वाचता येईल.  

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ७

वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहून झाल्यावर मग इतर मॉन्युमेंट्सकडे लक्ष्य केंद्रित केले. तसेच पुढे चालत गेलो आणि वर्ल्ड वॉर २ च्या मेमोरियलला पोचलो. हे मेमोरियल  दुसऱ्या महायुद्धात भाग घेणाऱ्या अमेरिकन सैनिकांना व असैनिक अमेरिकनांना समर्पित करण्यात आले आहे. तसेच हे मेमोरियल वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि लिंकन मेमोरियलच्या मधोमध बांधलेले आहे. 

हा स्क्रीनशॉट गुगल मॅप्सवरुन साभार

चिंता करी जो विश्वाची ... (३९)

माया सगुण साकार । माया सर्वस्व विकार ।

माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥
माया दृश्य दृष्टीस दिसे । माया भास मनासि भासे ।
माया क्षणभंगुर नासे । विवेके पाहता ॥ 

कलातीर्थ पुरस्कार २०१८ - ६ जाने सायं ५ वा. - सकळ ललित कलाघर, कटारिया हायस्कूल, पुणे

थर्ड बेल एंटरटेनमेंट आयोजित
कलातीर्थ पुरस्कार २०१८ : वर्ष ६ वे : निर्मिती गौरव
हस्ते
मा. श्री राजसाहेब ठाकरे व मा. सौ शर्मिलाताई ठाकरे