पुणे पत्ता राज्यभाषा आणि इतर..

पुणे पत्ता राज्यभाषा आणि इतर..
नको इतकं प्रशस्त ऑफिस.. भलंमोठं टेबल, त्यावर बेदम पसारा!
नको इतकं फोम भरलेल्या खुर्च्या..
मोठ्या आसामींना भेटायला मी थोडा ओशाळतो ते बहुधा ह्या बाकी गोष्टींमुळे...
 
सदर आसामी आम्हाला कॉफी प्यायला लावून कोणाशी फोनवर बोलत होती.
 
डोळे बारीक करून,
"एवढं संपवतो मग तुमच्याकडे पाहू"

झटपट घटवा, लाइफ़स्टाइल बदला !! (तुम्हीही हलके आणि तुमचे पाकिटही :-) )

तुम्ही सिग्नल ला उभे असता, अचानक कोणीतरी मध्यमवयीन माणूस किंवा किशोरवयीन मुले/मुली पटकन समोर येतात आणि एक व्हिजिटिंग कार्डाच्या आकाराचे पैंप्लेट आपल्या हातात सरकवतात....त्यावर काय असते ?, तर BEFORE आणि AFTER चे २ फोटो आणि  एका बाजूला वजन वाढवा दुसरीकडे वजन घटवा चे १००% रिझल्ट देण्याचे वादे !

दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा (३)

नवरात्री उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक प्रांताच्या आगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. परंतु मूळ उद्देश एकच आहे. तो म्हणजे दुर्गादेवीची उपासना, म्हणजेच शक्तीची उपासना. हिंदुधर्मीयासाठी हा उत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा नावाने हा उत्सव साजरा करतात. गुजराथ मध्ये नवरात्री उत्सवात गरबानृत्य करतात. परंतु नवरात्री म्हणजे प्रसादासाठी केलेली पक्वान्ने, नवी, रेशमी आणि जरतारी वस्त्रप्रावरणे, किंमती अलंकार आणि रासदांडीया इतकेच नाही.

दसरा सण मोठा .. नाही आनंदा तोटा (२)

नवरात्रीनंतर येणारा दिवस म्हणजेच दसरा. या दिवसाला विजयादशमी असेही संबोधिले जाते. हिंदू पंचांगामधे दसरा हा अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आहे. दसऱ्याचा मुहूर्त सर्वानाच लाभदायक असतो असे म्हणतात. म्हणूनच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवी सुरूवात करण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी कनिष्ठांनी ज्येष्ठांना सोने देण्याची प्रथा आहे. दसरा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. प्रत्येक प्रांतांच्या काही विशिष्ट पद्धती असतात. महाराष्ट्रात दसऱ्याचा आधीचा दिवस खंडेनवमी म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी अस्त्र,  शस्त्रांची पूजा केली जाते.

रामजी पांगेरा!

रामजी पांगेरा 
कात्रजजवळच्या वेळू गावामधला हा तरुण मुलगा. स्वराज्याच्या पायदळामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हा महापराक्रमी शिलेदार!

गावोगावी ... (६)

मार्च महिना संपत आलेला होता. शाळांच्या परीक्षा चालू होत्या. आमच्या नवीन घरातील फर्निचरचे राहिलेले काम देखिल चालू होते. आणि मला बँकॉकला जायचे होते.  माझे पती नोकरीनिमित्त त्या वेळेस बॅकॉकमध्ये होते. साऱ्याच घडामोडी एकत्रच घडत होत्या. त्यातच माझ्या डोळ्याचे दुखणे  त्रास देत होते. तिकडे लक्ष द्यायला मला वेळ नव्हता. पण तरी  डॉक्टर कडे  तपासणीसाठी जावे लागत होतेच. 
पुणे-मुंबई  प्रवास, त्या नंतर मुंबई-बॅकॉक या सर्वांची तिकिटे,  व्हिसा ही सर्व कामे एकेक करून मार्गी लागत होती.  त्यात मुलाची परीक्षा चालू होती.