गावोगावी ... (५)

देशोदेशीच्या माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा. भाषा, संस्कृती, वेषभूषा, चाली रीती. सारे काही वेगळे. प्रत्येक देशीचे काही आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचा इतिहास अनेक रसभरित कथानकांनी परिपूर्ण आहे. सर्वत्र संस्कृतीची जपणूक केली जाते.अधुनिक युगाच्या नव्या संकल्पना स्वीकारताना,भूतकाळ सर्वस्वी झुगारलेला नसतो. जुन्याला नवकल्पनांची  जोड देत हा वारसा जपलेला असतो. जगाच्या पाठीवर कुठेही जा.. माणसे अंतर्यामी समानच असतात हे मात्र त्रिवार सत्य.

दसरा सण मोठा - नाही आनंदा तोटा (१)

आजकाल सणांचे घरगुती स्वरूप बदलून ते
सार्वजनिक झाले आहे. घरोघरी सण साजरे होतातच,  परंतु सार्वजनिकरीत्या
मोठ्या प्रमाणावर सण साजरे करण्याची प्रथा रूढ झाली आहे. आधुनिक जीवनपद्धती
अनुसरणारी  नवीन पिढी, मोठ्या हौसेने या उत्सवांमध्ये सामील होताना दिसतात.
या निमित्ताने सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून काही कार्य करण्याची सवय
होते. समाज आणि संस्कृतीच्या दृष्टीने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण,
सांस्कृतिक उत्सव म्हणजे  पक्वान्ने, सजावटी, नवनवीन  वस्त्रप्रावरणे आणि
मनोरंजन इतकेच मर्यादित नाहीत. ते सण का साजरे केले जातात.

म्हणींच्या गोष्टी... (२)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.   विविध प्रकारच्या म्हणी,   वाक्प्रचार आणि सुविचारांच्या  अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.   काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे  वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात,   त्या मागे काय कथा असतील?  
तर काही म्हणींच्या या कथा...  

"ह्यात नाही राम - त्यात नाही राम"

सेल्स आणि मार्केटिंग!

सेल्स आणि मार्केटिंग! 
आपल्या देशामधल्या सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वार्षिक संमेलन 
म्हणजे दिवसभर देशांमधल्या सर्वोत्तम लोकांसोबत  
सेल्स आणि मार्केटिंग strategies वरती केलेल्या गहन चर्चा...
मार्केटिंग वर खर्च करायचा कुठून?, 
आधी विका, पैसे मिळवा 
मग अभिमानाने, हक्काने मागता येईल.. 
साहेबाचे हे धोरण सगळ्यांनीच उचलून धरल्यामुळे 
काहीसं वैतागून परत निघताना माझी गाडी हाय वे वर आली! 

गावोगावी ... (४)

प्रत्येक गाव, प्रत्येक शहर वेगळेच असते. त्यांना स्वतःचे एक व्यक्तिमत्त्वही असते. भाषा धर्म, चाली-रीती  एक असले तरीही हे वेगळेपण अढळते. भाषेचा लहेजा देखील वेगळा भासतो. नुसत्या बोलण्याच्या पद्धतीवरून, बोलणारा पुण्याचा आहे की मुंबईचा, नागपूरचा आहे की साताऱ्याचा हे ओळखता येतेच.  प्रत्येक शहराची एक खासियत असते. वेगळेपण म्हणा ना.

सगुण स्वरुप ते निरगुण निराकार!

सगुण स्वरूप ते निर्गुण निराकार!

१.
एक अभिनेता सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ शेअर करतो, 
त्यात त्याचा ६-७ वर्षांचा मुलगा जुन्या कागदाचे बोळे करतो, 
एकमेकांवर रचतो आणि नंतर रंगवून त्याचा "बाप्पा" बनवतो! 
२.
करोना काळात मास्क घातलेला गणपती, 
कधी मंगळयान देखावा, मग अंतराळवीर गणपती!
कारगिलच्या युद्धात सैन्याचा अधिकारी झालेला गणपती!

गावोगावी ... (३)

प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आवडी-निवडी असतातच (चूक अथवा बरोबर) मतेही असतात. हा तर लोकशाहीतील व्यक्तिस्वातंत्र्याने, प्रत्येकाला दिलेला जन्मसिद्ध अधिकारच आहे. आवडी-निवडी हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो, असेही म्हणतात, असेलही ---पण एकमात्रं नक्की, की कुणाची आवड निवड, मते इतरांपेक्षा वेगळी आहे, म्हणून ती व्यक्ती वाईट आहे, असे समजणे सुज्ञ, सुजाणपणाचे लक्षण नव्हे. सारे काही माझ्यासारखेच, माझ्या मताप्रमाणे असले पाहिजे,   हा अट्टहास सोडून, दुसऱ्याच्या आवडी निवडी आणि मतांचा आदर करणे, करता येणे, हे सभ्य, सुसंस्कृत आणि प्रगल्भ मनाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

बाप

  सकाळची वेळ. सगळीकडे एक प्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

म्हणींच्या गोष्टी ... (१)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.  विविध प्रकारच्या म्हणी,  वाक्प्रचार आणि सुविचारांच्या  अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.  काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे  वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात,  त्या मागे काय कथा असतील?