रूपा

(एक ऐकलेली कथा)

ते गाव तसं लहानसच होतं.   पण मोठं देखणं. नाव होतं रामपूर. 
लहान मोठी कौलारू घरे होती.   त्या भोवताली फुललेल्या शोभिवंत  बागा, अंगणात दिसणाऱ्या  मनमोहक रांगोळ्या, तुळशी वृंदावने,   हे सारे पाहताना  मनास सात्विक  प्रसन्नता लाभत असे.

गावातले स्वच्छ, प्रशस्तं, तांबड्या मातीचे  वळणदार रस्ते आणि त्यावरची माणसांची वर्दळ त्या देखण्या चित्रास
जिवंतपणा आणीत असत.

अशक्य ते शक्य केलं कोरोनाबाबानी

       कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंब ईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली ,मग ती सरकारी असोत की खाजगी. टपप्प्यानी कार्यालयात जाण्याची पद्धत सुरु झाली. एरवी नियमित दांड्या मारणारे कर्मचारी "आता मी कधी ऑफिसला जाणार असं मानभावीपणे विचारु लागले. खरंतर त्याना बरंच वाटत असावं. जसं काही हे कर्मचारी सगळं ठीक होतं तेव्हा नियमित ऑफिसला जात होते.

आंबट गोड

आज बस जवळ जवळ रिकामीच होती. आणि मला चक्क बसायला जागा मिळाली होती. उभ्याने प्रवास करणारे नव्हतेच. त्यामुळे  आजचा प्रवास सुखद असेल असे वाटत तरी होते. 
तेव्हढ्यात  "आई ग्गं!!!    कित्ती आंबट आहे. "  असे जरा मोट्ठ्या आवाजातले उद्गार ऐकू आले.

जे पैशाने विकत मिळत नाही

 "डॉ. ए. जे. क्रोनीन यांनी लिहिलेले "Adventures in two worlds " हे आत्मचरित्र एकाद्या कादंबरीपेक्षाही अधिक चित्तवेधक आहे. क्रोनीन यांनी यात आपल्या आयुष्याचा पट संपूर्णपणे उलगडलेला नाही, पण त्यातील त्यांचे ठळक अनुभव कालानुक्रमे अतिशय रसाळ भाषेत निवेदन केले आहेत आणि ते अतिशय वाचनीय झाले आहेत. त्यांच्या आयुष्यातील त्या प्रसंगापैकी मला एक अतिशय आवडलेला प्रसंग खाली दिला आहे.  

त्रैलोक्य प्रदक्षिणा

(एक पौराणिक कथा) 
" नाही नाही नाही , मीच श्रेष्ठ आहे. अधिक वेगवान आहे. माझ्या वेगाची  बरोबरी कुणीच करू शकत नाही . "

अप्रिय आठवणींपासून सुटका

मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.

फ़्रि स्पिरिट!

फ्री स्पिरीट!
परत एकदा तिचा मोठा मेसेज.. 
त्याला वावगी नाही खरं म्हणजे कलासक्ती! 
पण तो थोडा वास्तववादी! 
आज तीन महिने होतील 
तिला असं तडकाफडकी 
मुंबईला जाऊन.. 
कुठल्याश्या स्टुडिओमध्ये,
 कुठल्याश्या आर्ट फोटोग्राफरला असिस्ट करायचं म्हणून गेली! 
त्याला सांगून!