एक प्रस्तावना आणि दोन टीपा

     पी.जी.वुडहाउस म्हटल्यावर आठवतो तो त्यांचा नायक बर्टी म्हणजेच बरट्रॅम वूस्टर आणि त्याचा खाजगी सेवक म्हणजे बटलर जीव्ह्ज..बर्टीने काही घोटाळे करून ठेवायचे व ते जीव्ह्जने निस्तरायचे हा त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांचा गाभा ! अर्थात या दोन पात्रांशिवायतही अनेक कथा व कादंबऱ्या वुडहाउस यांनी लिहिल्या आहेत.

"नाट्यलेखनाविषयी" - हॅरॉल्ड पाईन्टर

ब्रिस्टल येथे १९६२ साली राष्ट्रीय विद्यार्थी नाट्योत्सवात हॅरॉल्ड पाईन्टर ह्यांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

एकमेव

      नेली हार्पर ली या लेखिकेची "To kill a mocking bird" ही पहिलीच आणि एकुलती एकच कादंबरी  तिच्या वयाच्या ३५ व्या वर्षी म्हणजे ११ जुलै १९६० मध्ये प्रकाशित झाली आणि लगेचच १९६१ मध्ये साहित्यविश्वातील सन्माननीय पुलित्झर पारितोषिक ही तिला मिळाले.

कोर्ट - एक वेगळा प्रयत्न

'वेगळ्या विषयांला हात घालू पाहणारा चित्रपट' असे समजून 'व्हॉट अबाऊट सावरकर' पाहिला आणि बराचसा पस्तावलो. पण 'कोर्ट' हा चित्रपट मात्र विषय फारसा वेगळा नसला तरी मांडणी अगदीच वेगळ्या धाटणीची असलेला चित्रपट आहे.
तो 'चांगला' आहे का हा वैयक्तिक आवडीनिवडीचा मुद्दा झाला. पण जी 'वेगळी मांडणी' त्यात केलेली आहे ती निश्चितच स्वागतार्ह आहे. थोडे पुस्तकी वाक्य वापरायचे झाले तर 'तो वेगळा आहे म्हणून चांगला आहे असे नव्हे, तर तो वेगळा आहे हे चांगले आहे'.

'विशेष' माहेरपण

शांता शेळके कवयित्रीने ' रानीच्या पाखराला माहेरी सांगावा' घेऊन
पाठवतातच, हे आपण समजू शकतो पण राजा बढें सारख्या कवीनेही माहेरावर कविता
करावी.. असं हे 'माहेरपण'! स्त्रीच्या जीवनातील एक हळवा, नाजुक कोपरा!
ही माहेराची ओढ वय वाढत जातं तसं तसं कमी होत जातं असावं कदाचित पण ही
ओढ नाहीशी होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य!