आता बरेचसे सोपस्कार पूर्ण झाल्याने माझे टेंशन बरेच कमी झाले होते. आता फक्त सामान घेऊन विमानात बसले की झाले. मग काही वेळाने आम्हाला बोर्डिंग पास बघून आत सोडण्यात आले. ह्या वेळी माझे आसन मधल्या रांगेत पण कडेला होते. सामान ठेवून मी माझ्या आसनावर बसले. फोन बंद करण्याआधी एकदा घरी फोन केला. आता मला खूप शांत वाटत होते. विमानाने उड्डाण केले.
समोरच्या स्क्रीनवर We are family नावाचा चित्रपट लागला होता. तो बघत बसले. जरा वेळाने जेवण आले ते घेतले. चित्रपट संपल्यावर शांत चित्ताने झोपी गेले.