आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो.
ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही.
म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी:
"स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।"
स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया!