किक्लाची धुलाई जोरदार चालू होती. पोलिसावर हात उचलणं, म्हणजे नक्की काय हे त्याला जाणवून देण्यात डावले, नेटके आणि देखणे अजिबात कसूर करीत नव्हते. बाहेरून पाहणाऱ्या श्रीकांत सरांना अचानक ही मारहाण निरर्थक वाटू लागली. मग त्यांनी
डावलेंना बाहेर बोलवले. " डावले तुम्हाला राग आलाय, हे ठीक आहे. पण त्याच्याकडून माहिती काढणं जास्त जरूरी आहे.