नवीन नोकरी मिळाली, नवे घर मिळाले आणि नवे शेजारी.
एक दिवस रात्री गाढ झोपेत असताना गूढ आवाज यायला सुरुवात झाली. आधी वाटले, स्वप्नातच कोणीतरी आवाज करत आहे. नंतर वाटले, गजराच्या आवाजात काहीतरी बिघाड झालेला दिसतोय. दोन्ही गैरसमजच निघाले. जगातील सगळे आवाज एकवेळ बदलतील पण गजराचा आवाज कधीही बदलत नाही. तर तो गूढ कुई कुई आवाज कशाचा आहे, कळेना. दोन रात्री तशाच गेल्या. एक दिवस सायंकाळी घरी आलो तर माळ्यावरचे एक खोके हलत होते. मी ते उघडून पाहिले नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी चक्क एका खारीने माळ्यावरून उडी घेतली.