बटाट्याच्या चाळीतला 'लॉकडाऊन'

बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली!
चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली.

मोनीचे लग्न

  सध्या लग्ने जमायला वेळ लागत असला तरी एकाच लग्नाच्या गोष्टी दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट वगैरे सारख्या चालूच आहेत.आणि त्यातही नवरा नवरी समोर असताना आणि एकमेकाला लग्न करायाचे आहे असे सांगत असतानाही लग्न लांबत जाते व  "आता केव्हां एकदा लग्न होतेय ?" असे म्हणण्याची पाळी   दर्शकांवर म्हणजे आपल्यावर येते..सुदैवाने आमच्या घरात कोणी लग्नाचे नसल्यामुळे जवळपासच्यांच्याच लग्नाच्या चर्चा ऐकायला मिळतात आणि त्यांच्याकडे मुलगा असेल तर मुलाचे आणि मुलगी असेल तर मुलीचे लग्न जमणे किती कठीण आहे हेच ऐकायला मिळते,म्हणजे पूर्वी मुलीचे लग्न जमणे हे एक अवघड काम असे वाटे आणि त्यामुळेच बाळकराम(गडकर

संगीतकार पु. ल.

उद्या पुल ऊर्फ भाई हे व्यक्तिमत्व आपल्यातून जाऊन वीस वर्षे होतील. पण त्यांचं आपल्या हृदयातील स्थान अढळ आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या एका जरा उपेक्षित पैलूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न
         

बायकोची अम्माजान!

बायकोची अम्माजान!  

उद्या आईचा वाढदिवस!
फोन केला,
गयावया केल्या, 
की "या पुण्यात! "
पण बाबा नाही म्हणजे नाहीच तयार होत!  
त्यात आता ह्या साथीचा मजबूत बहाणा मिळाला आहे त्यांना!  
मी अपेक्षा करणे सोडून दिले होते.  

सिमला ऑफीस

           नुकताच औरंगाबादला गेलो (अर्थात हे कोविद १९ चे आगमन होण्यापूर्वीचे आहे).व १०  जुलै तारखेस परत यायचे ठरवले तर कोणीतरी शंका काढली  नऊ तारखेपासून बारा पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे.  अलीकडे  मी घरच सोडत नसल्यामुळे अश्या इशाऱ्यांची दखल घ्यायचे मला कारण पडत नाही.( त्यामुळे कोविद १९ नंतरच्या इशाऱ्यांमुळेही माझी फारशी कुचंबणा झाली नाही.असो !

स्पिनोझाचा देव

    अमेरिकेतील अनेक विद्यापीठात भरणाऱ्या वैज्ञानिक सम्मेलनात हजर रहाताना आइनस्टाइनला एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा "हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे,"स्पिनोझा हा एक डच तत्त्वज्ञ धर्माने ज्यू होता,त्याकाळात रेने देकार्त या फ्रेन्च तत्त्वज्ञाबरोबर त्याचाही एक विवेकवादी तत्वज्ञ म्हणून  बोलबाला होता..सतराव्या शतकात  ऍमस्टरडॅम येथील एका यशस्वी पण फार श्रीमन्त नसणाऱ्या उद्योजकाचा हा मुलगा !

एक पाणचट सकाळ!

आज मी तुमच्या समोर काही गुन्ह्यांची कबुली द्यायला आलेलो आहे
गुन्हा क्रमांक १ 
ह्या संचारबंदीच्या काळात 
रिकामे नाहीच बसायचे, प्रतिकारशक्ती वाढवायची म्हणजे व्यायाम नको का करायला? वगैरे सुज्ञ विचारांना रोज नवे नवे पदार्थ उडवताना नाही म्हणजे नाहीच केलेला व्यायाम!

फरक पडतो !

       मी आपला त्याच एका प्रश्नात अडकलेला - "लग्न करायचं की नाही"?
मग आयुष्यात तू आलीस.
तरीही पूर्वग्रहदूषित ह्या मनाचा प्रश्न कायमच ! पुढे जावं की नाही, जावं तर का जावं? नाही जावं तरी का नाही?

महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोक सांगीतला होता:
जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०)