मुर्डी...
मी पाहिलेले गांव, तसं म्हणण्यापेक्षा मला भावलेले गांव म्हणणे जिल्हा रत्नागिरी, दापोली तालुक्यातील मुर्डी... माझं मूळ गांव.
दृष्य पहाण्याची क्रिया डोळ्यांशी थांबते. पण ती अंतरापर्यंत उतरली, घर करून राहिली की ते दृष्य भावतं, तेथे जवळीक निर्माण होते.
मुर्डी, मुळ नांव मरुत्तटी. मरुत म्हणजे डोंगर. डोंगराचे तटी वसलेले गाव म्हणुन मरुत्तटी. असा या नावाचा अर्थ. शिवरायांनी ह्या गावाला भेट दिल्याचा इतिहास आहे.