(काही दिवसांपूर्वी मी वैश्विक शेकोटी नावाचा एक लेख लिहिला होता. या लेखात जमीन आणि तेल या दोन नैसर्गिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल सर्वसाधारण माहिती आणि त्या गैरवापरातले धोके दाखवायचा प्रयत्न केला होता. आता प्रस्तुतची लेखमाला नैसर्गिक तेल आणि वायू यांच्या उत्पादनातली वाढ, घट आणि कालांतराने समाप्ती या विषयावर. )
मराठीत एक म्हण आहे "तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे"... आता लवकरच ही म्हण शब्दशः खरी ठरण्याची वेळ येऊन ठेपलीये.