मागे मी माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक छोटासा भाग 'मनोगत' वर घातला होता. त्यांत हिंदी आरमाराचे सशस्त्र आंदोलनातील एका प्रसंगाचे वर्णन आले आहे. त्या प्रसंगानुसार ब्रिटिश सैन्याला खूपच क्षती पोचण्याचा घोका निर्माण झाला होता आणि सरकारवर दहशत बसली होती. एकूण आरमाराच्या उठावाचा जो परिणाम व्हायला होता तो झाला होताच. त्यातील काही ओळी खाली उद्धृत केल्यात. स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या व्यक्तीने तेव्हा काय अनुभवले आणि तेव्हाच्या जनमानसांत आपल्या मोठमोठ्या नेत्यांबद्दल काय मत होते हे दर्शविणारे बोल आहेत ते.
" आपसातील रक्तपात धूळधाण टळावी म्हणून, सरकारतर्फे नौसैनिकांना सांगण्यात आले, " तुमचे प्रश्न आम्ही तुमच्याच राष्ट्रीय नेत्याकडे सोपवितो, त्याचे निर्णय तरी ऐकाल का नाही. " यात कुटिलनीति होती. रक्तपात टळावा आणि रँन्टिंग्जना परस्पर धडा मिळावा हाच हेतू होता. कारण आपल्या राष्ट्रीय नेत्यांचे लष्करी अज्ञान आणि अहिंसादी उदार तत्त्वे, धोरणातील धरसोड वृत्तीची कुवत ! धरणीवर पावले स्थिर राखून खंबीर देशहितात्मक निर्णय घेण्याऐवजी इंटरनॅशनल विचारधारा ... अती उच्च विचारसरणीने प्रेरित... त्याचे अद्वितीय अव्यवहार्य पद्धतीचा गोऱ्यांना - सरकारला अनुभव होताच. त्याचाच लाभ त्यांनी घेतला. "
हिन्दी आरमाराचा उठाव - (२) [ http://www.manogat.com/node/7930 ] मधून.
भिडे -