बालोबा, रोहिणी, सागर प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
प्रशासक महोदय, तत्परतेने माझी चूक निस्तरल्याखातर धन्यवाद.
तुमच्या म्हणण्यानुसार हा दुवा देत आहे.
लोकांच्या उपयुक्त सूचनांचा समावेश करून परिष्कृत केलेली आवृत्ती खाली देत आहे.
सूचना कर्त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
मी तर असल्या लाख पर्या पाहील्या ।
तुजपरी न पाहीली, हो, तुजपरी न पाहीली ॥ धृ ॥
उफ ही नजर, उफ ही लकब, कोण न मग होईल फिदा ।
केस हे की कृष्णमेघ, ही नजर विद्युल्लता ।
जाणे कुणा कुणावर कोसळे अता ॥ १ ॥
तू सुरेख, ऋतूही सुरेख, मन न हे काबुत असे ।
रस्ते हे चिडिचूप कसे, स्पंदने भरती पिसे।
प्यायल्या वाचून, मला चढे ही नशा ॥ २ ॥
बोलशी न तू जरी, मरून तर न जाईन मी ।
तू परी की अप्सरा, तोरा का तुज एवढा ।
ऐकून पाहा कधी कुणाचे जरा ॥ ३ ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०८१५