पाहिल्या आहेत लाखो आजवर मी सुंदरी
पाहिली ना तुजपरी ।ध्रु।
दृष्टि ही! ही मोहिनी! मग कोण ना जाई बळी!
नयन हे, की ह्या विजा? घन दाटले ह्या कुंतली
ना कळे, लिहिलीय शिक्षा कोणकोणाच्या शिरी!
पाहिल्या आहेत ... ।१।
तूहि सुंदर, ऋतुहि सुंदर, हृदय हे ताब्यात ना
मार्ग नीरव, त्यात धुंदी आज येई स्पंदनां
आज मज चढली नशा, मी प्यायलो नाही तरी
पाहिल्या आहेत ... ।२।
बोलसी तू ना, तरी मरणार मी नाही गडे
तू परी, की अप्सरा? तुज गर्व का इतका चढे?
बघ तरी ऐकून कोणाचे जरा केव्हातरी!
पाहिल्या आहेत ... ।३।
चाल :
कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला
थांबला तो संपला
ध्रु : गालगागा । गालगागा । गालगागा । गालगा
गालगागा । गालगा
कडवी : गालगागा । गालगागा । गालगागा । गालगा
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेला काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.
)
३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील
)
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)