साधेच शब्द आणि सोपी वाक्यरचना करूनही पुरातन काळाचे वातावरण निर्माण करण्यात काहीही कमी जाणवत नाही हे विशेष.असेच नेमक्या लांबीचे भाग एकामागून एक ठराविक काळाने प्रकाशित करत गेल्यास उत्कंठा आणि समाधान दोन्हीचे सातत्य राहील असे वाटते.

महेश ह्यांच्या सहमत आहे. उदा.: "त्या गृहस्थाने एकदा विष्णूला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं" हे वाक्य अनेकांनी "त्या गृहस्थाने एकदा विष्णूला आपादमस्तक न्याहाळलं" असे लिहिले असते. आपादमस्तकवरून प्रश्न मनात आला की, डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळणे योग्य की पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळणे योग्य? असो.

अवांतर: प्रतिसाद वाचून मनोगतावर फार पूर्वी प्रकाशित झालेली दुभंगलेला वाडा ही गझल आणि त्यावर आधारित दुभंगलेला खांदा ही काव्यरचनाही आठवली.