टिकाऊ टिकाऊपणा हे शब्द चांगले आहेत.

सस्टेन ह्या क्रियापदाचा संस्कृत आणि मराठी शब्दकोशात मागोवा घेतल्यावर त्याचे धरणे, धरून राहणे, पाळणे (पालन करणे ह्या अर्थी), अवस्था स्थिर राहणे /ठेवणे असे काहीसे अर्थ मिळाले. ह्यावरून सस्टेनेबलला स्थिरस्थायी आणि सस्टेनेबिलिटीला स्थिरस्थायिता किंवा स्थिरस्थायित्व असे काहीसे शब्द प्रचारात आणता येणे शक्य आहे असे सुचवावेसे वाटते.

उदा.

एन्व्हायरॉन्मेंटल सस्टेनेबिलिटीला पर्यावरणीय स्थिरस्थायिता (किंवा पर्यावरणीय धरणीयता !)

किंवा

सस्टेनेबल ग्रोथला पालनीय वाढ किंवा स्थिरस्थायी वाढ असे काहीसे म्हणता येईल.

अलीकडेच सागर लिमये ह्यांच्या घटस्फोट घेणे हे निसर्गाविरुद्ध जात आहे! ... शास्त्रज्ञ सांगताहेत. ह्या लेखात निसर्गसंगोपन असा शब्दप्रयोग वाचला त्यावरून एन्व्हायरॉन्मेंटल सस्टेनेबिलिटीला पर्यावरणीय संगोपनीयता आणि सस्टेनेबल ग्रोथला संगोपनीय वाढ असे म्हणून पाहायला हरकत नाही असे वाटते.

वरील दोन्ही अर्थांच्या छटेत फरक आहे स्थिरस्थायितेत आपले आपण टिकून राहणे असा तर संगोपनीयतेत इतर गोष्टीला टिकवून ठेवणे असा अर्थ होतो त्यामुळे दोन्ही पर्यायांचा वापर संदर्भाप्रमाणे करता येईल. प्रयोग करून पाहावे.