अवंती ताई धन्यवाद...!!!

माझा मुद्दा नेमका काय आहे ते तुम्हाला आणि मंजुशा यांना समजला आहे.

तुम्ही एक छान नवीन मुद्दा सांगितला आहे तोही अगदी तंतोतंत खरा आहे की :

"मुलीला नवरा शोधताना जबाबदारी नसलेला नवरा शोधते. पण त्याचवेळी आपल्या मुलावर आपल्याच मुलीची जबाबदारी टाकायला मागे पुढे पाहत नाही."

आणि त्यात आणखी भर घालतात ते सासू धार्जिणे (आई वडील धार्जिणे) जुने मराठी कौटुंबिक चित्रपट. अशा चित्रपटांत मुलगा आणि सून म्हणजे दानव, खलनायक, पापी, नालायक असेच असतात असा कांगावा केला जातो. त्यांची बाजू कधीच मांडली जात नाही.

आताशा येवून गेलेला "... मातीच्या चुली" हा चित्रपट मात्र बऱ्यापैकी दोन्ही बाजू मांडतो.

या संदर्भात मी आणखी एक चर्चा सुरू केली आहे. ती आजकालच्या कायद्यांसंदर्भात आहे. जरूर वाचावी व आपले मत मांडावे.

दुवा खाली देत आहे :

दुवा क्र. १