हा धागा वाचून संस्कृती एक बुडणे या धाग्याचा संदर्भ लागला. गांधीभवन सदर संस्थेने पैसे भरून वापरायला घेतले होते तर मग तिथे त्यांनी कोणता कार्यक्रम करावा यावर आक्षेप घेता येणार नाही असे वाटते. म. गांधींनी आयटेम नृत्याविषयी काय म्हटले असते ते असो पण त्यांनी सांगितलेल्या, बजावलेल्या कित्येक गोष्टी त्यांचे अनुयायी म्हणवणारे लोक पायदळी तुडवतात. त्याविषयी काही न बोलता केवळ म. गांधीच्या नावाच्या वास्तूत उत्तेजक नृत्य झाले याचा संताप येणे मला प्रामाणिक वाटत नाही.