वेगवेगळ्या काळांमध्ये आपली संस्कृती वेगवेगळ्या कारणांमुळे बुडत होती/बुडाली होती. इतके करूनही उरलेली संस्कृती आतापर्यंत कशीकाय तरंगत होती हे तो दयाघान प्रभूच जाणे. संस्कृती बुडण्याची कारणे अशी
- स्त्रियांचे शिक्षण
- विधवा विवाह
- बाल विवाह बंद
- सतीची प्रथा बंद
- संततीनियमनासाठी साधने वापरणे
- नऊवारी ते पाचवारी
- स्त्रियांनी सायकल चालवणे
- फायर चित्रपट
- व्हॅलेंटाइन डे साजरा करणे (मात्र मायकेल ज्याकसन इथे येऊन नाचून गेला तर संस्कृती अबाधित राहते कारण तेव्हा संस्कृतीने खास भगव्या रंगाचे लाइफ-ज्याकेट घातलेले असते.)
यादी मोठी असावी. गरजूंनी आपल्या मकदुराप्रमाणे भर घालावी.
हॅम्लेट