एका गझलकाराच्या एका शेराबाबतीत स्वतः चित्त यांनी असे म्हंटले होते की  शेरातील पहिल्याच ओळीत सगळे सांगून झाले आहे असे वाटत आहे.
बरेचदा पहिली ओळच फार चांगली असली की दुसरी तिच्यापुढे ओळ फिकी पडते. किंवा जे सांगायचे असते ते पहिल्या ओळीतच संपलेले असते, एवढेच मला सांगायचे असावे. असो. नेमका संदर्भ द्यावा.

याचा अर्थ असा की गझलेतील द्विपदींमध्ये प्रत्येक ओळीत आशय बऱ्यापैकी समसमान विभागला जावा असे म्हणायचे असावे.
असे म्हणायचे असावे, असे तुम्हाला वाटते आहे. मला असे वाटत नाही. दोन्ही ओळींत आशय समसमान विभागला जाणे गरजेचे नाही. नियम नाही. दोन ओळींत दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात.
सब्जा-ओ-गुल कहाँ से आये हैं?
अब्र क्या चीज़ है, हवा क्या है?
गालिबच्या ह्या दोन ओळींत कुठली समसमान विभागणी आहे?


याचा अर्थ मी असा घेतो की 'पण' किंवा 'ही' या दोन्ही अर्थाने एक एक शब्द असायला हवा.
सोयीनुसार अर्थ घ्यायला हरकत नाही. पण दोन वेगवेगळे शब्द कशाला हवेत? संदेह निर्माण होणे ही उत्तम गोष्ट आहे. संदेह निर्माण होणे म्हणजे शक्यता निर्माण होणे. म्हणजे असे मला वाटते. गझलेच्या शेराची ही खासियत असायला हवी असे म्हणतात.  शेरात अगदी बारीक, तलम, रिफाइंड अर्थांचे पदर (कशीर से कशीर मानी) निर्माण व्हायला हवेत, ह्या आशयाचे शम्सुर्रहमान फारुकी ह्यांचे वक्तव्य इथे नमूद करावेसे वाटते. मी लिहिताना ह्या गोष्टीचा अवलंब करण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो.

गझलेवर एखाद्या गझलेच्या निमित्ताने अशाप्रकारच्या अनेक चर्चा मनोगतावर एकेकाळी झाल्या होत्या. त्यात असे अनेक मुद्दे चर्चिले गेले होते, हे इथे नमूद करावेसे वाटते. पण दुर्दैवाने अशा जवळपास सर्वच चर्चा "कालातीत" झालेल्या आहेत.

असो. वेळेअभावी तूर्तास एवढेच.