तिथे मनोगतावर वावरताना मला एक विवक्षित अडचण जाणवते आहे.
एखाद्या दुव्यावर टिचकी मारून त्या पानावर गेले. की येण्याची नोंद गायब झालेली असते. तिथे पुन्हा नव्याने नाव नोंदवावे लागते. आधीच्या पानावर माझ्या नावनोंदणीची कुकी असताना , पुढच्या पानावर मी आल्याची नोंद नाही असे पाहून दुसऱ्या एखाद्या माणसाने त्याची येण्याची नोंद करण्याचा प्रयत्न केल्यास मात्र तिथे माझेच नाव दिसते.
 मलाही पूर्वी ही अडचण यायची. मी फायरफॉक्स वापरतो, आय इ बद्दल काही कल्पना नाही. हल्ली असे होणे आपोआप बंद झाले आहे.

अजून एक म्हणजे, मुख्य पानावर आल्याची नोंद करून दैनंदिन लेखांच्या पानावर आले की कुकी तर गायब असतेच पण दैनंदिन लेखनाच्या नोंदीही बऱ्याच जुन्या म्हणजे ३-४ दिवसांपूर्वीच्या असतात. संचित कुकी / कॅश सुद्धा मोकळी करून पाहिली पण हे जुन्या नोंदी दिसण्यामागचे कारण काय असावे हे कळू शकले नाही.
हाही अनुभव मला येतो. इथे पाहा. हे मात्र अजून सुरूच आहे. ह्या विषयी प्रशासकांना व्य. नि. केला होता तेव्हा त्यांनी कॅश रिकामा करण्याची सूचना दिली परंतु त्याने काही फायदा झाला नाही. इतर कोणत्याही संकेतस्थळावर ही अडचण आलेली नाही तेव्हा हे मनोगतावरीलच भूत असावे. एखादा संगणक-मांत्रिक शोधायला हवा.

ता. क. कुकीज पोटात जातात असे टंकण्याचा अनावर मोह झाला.